आमच्या संकेतस्थळावर (Website ) आपले स्वागत आहे. आपण हे संकेतस्थळ ब्राउझ करणे अथवा वापरणे सुरू ठेवल्यास त्याचा अर्थ आपण सहमत आहात की खालील अटी व शर्तीं आपणास मान्य असुन त्यांचे पालन करणे आपणास बंधनकारक आहे. आपण या अटी व शर्तींच्या कोणत्याही भागाशी सहमत नसल्यास कृपया आमचे संकेतस्थळ वापरू नये.
‘ट्रॅव्हलक्लिक्स(Travelclix)’ किंवा ‘आम्हाला’ किंवा ‘आम्ही’ हा शब्द संकेतस्थळाच्या मालकास सूचित करतो. “आपण” किंवा “आपली” हा शब्द या संकेतस्थळाचा वापरकर्ता किंवा दर्शक, वाचक यांस उद्देशुन आहे.
या संकेतस्थळाच्या वापराच्या अटी:
- या संकेतस्थळावर दिलेली माहिती ही केवळ लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने दिलेली आहे. आम्हाला त्या-त्यावेळी आलेले अनुभव आणि मिळालेली माहिती इथे या संकेतस्थळावर (Website) देत आहोत. दिलेली माहिती पुर्णपणे बरोबर असल्याचा आम्ही दावा करत नाही पण आमच्या प्रयत्नातुन शक्य तितकी योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. Travelclix.in संकेतस्थळावर दिलेली माहिती कोणत्याही पुर्वसुचनेशिवाय केव्हाही बदलण्याचा किंवा अधिक माहिती देण्याचे सर्व अधिकार आम्हाला आहेत.
- या संकेतस्थळावरील कोणतीही माहिती किंवा सामग्रीचा वापर करणार असाल तर तो पूर्णपणे आपण आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर करायचा आहे, ज्यासाठी आम्ही किंवा संकेतस्थळावर माहिती देणारी इतर त्रयस्थ व्यक्ती/संस्था कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध कोणतीही माहिती, सेवा किंवा उत्पादने आपल्या विशिष्ट आवश्यकता पूर्ण करते किंवा नाही याची खात्री करण्याची जबाबदारी सर्वतः आपली असेल.
- या संकेतस्थळावरील सामग्री जसे कि फोटो, माहिती, डिझाईन आणि ग्राफिक्स हे आमच्या मालकीचे आहे किंवा आमच्याकडे परवाना कृत आहे. काही माहिती हि विविध संदर्भ पुस्तकांतून वापरलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्या पुस्तकाबद्दल व लेखकाबद्दल नमूद हि केलेले आहे. तर अशी माहिती हि संबंधित लेखकांच्या मालकीची असेल आणि आम्ही त्याचा आदर करतो.
- या संकेतस्थळावर पुनरुत्पादित केलेले सर्व ट्रेडमार्क हे आमची मालमत्ता नसून आम्ही ती असल्याचा दावा करीत नाही. या संकेतस्थळाचा अनधिकृत वापर हानीसाठीच्या दाव्यास जन्म देऊ शकेल आणि / किंवा तो गुन्हा असू शकेल. वेळोवेळी या संकेतस्थळामध्ये इतर संकेतस्थळाचे दुवे देखील समाविष्ट असू शकतात. अधिक माहिती प्रदान करण्यासाठी आणि आपल्या सोयीसाठी हे दुवे प्रदान केले आहेत. आम्ही संकेतस्थळांना मान्यता देत आहोत हे ते दर्शवत नाहीत. Travelclix.in संकेतस्थळावर नमूद केलेल्या इतर संकेतस्थळांच्या (External Links) लिंक्स व त्या संकेतस्थळावर वर असलेल्या माहितीची/सामग्रीची कोणतीही जबाबदारी आम्ही स्वीकारत नाही.
- Travelclix.in संकेतस्थळ केवळ छायाचित्रे वापरुन आपल्याला वेगवेगळ्या पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी केलेली आहे. आपण या संकेतस्थळावरील छायाचित्रे अथवा माहिती कोणत्याही वैयक्तिक, सामाजिक किंवा व्यावसायिक कारणासाठी आमच्या परवानगी शिवाय वापरू शकत नाही.
आमच्या सेवेमध्ये/संकेतस्थळावर इतर वेबसाइटचे दुवे/लिंक असू शकतात जसे की गुगल ऍड. आपण तृतीय-पक्षाच्या दुव्या/लिंकवर क्लिक केल्यास आपल्यास त्या साइटवर निर्देशित केले जाईल. लक्षात घ्या की या बाह्य वेबसाइट आमच्याद्वारे नियंत्रित केल्या जात नाहीत. म्हणूनच या वेबसाइट्सच्या प्रायव्हसी पॉलिसी/अटी व शर्तीचा आढावा घेण्याचा आम्ही तुम्हाला सशक्त सल्ला देतो. त्यांच्यावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही आणि कोणत्याही तृतीय-पक्षाच्या/वेबसाइट किंवा त्यांच्या कोणत्याही सेवांच्या सामग्री, गोपनीयता धोरणे किंवा पद्धतींसाठी कोणतीही जबाबदारी घेतली जाणार नाही. travelclix.in वेबसाइट/संकेतस्थळावर, गुगल ऍड किंवा आम्ही दिलेल्या इतर वेबसाइटच्या लिंक वर क्लिक करून आपल्याला कोणत्याही प्रकारची हानी किंवा नुकसान झाल्यास त्याला सर्वस्वी तुम्ही म्हणजे travelclix.in वेबसाइट वापरणारे जबाबदार असतील, आम्ही जबाबदार राहणार नाही.