महाराष्ट्र

महाराष्ट्र हा येथील इतिहास, नैसर्गिक सौंदर्य, बॉलीवूड आणि बऱ्याच कारणांसाठी ओळखला जातो. भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्र हे युनेस्कोने जाहीर केलेल्या “जागतिक वारसा स्थळांसाठी” सुद्धा प्रसिद्ध आहे जसे की “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पश्चिम घाट (सह्याद्री), कास पठार, अजिंठा, वेरूळ आणि एलिफंटा लेणी.

आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी इतर बरीच ठिकाणे आहेत. महाराष्ट्राला विस्तीर्ण समुद्राचा किनारा लाभला आहे आणि अशा प्रकारे सुट्टी घालवण्यासाठी सुंदर समुद्र किनारे आहेत. महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक मंदिरे तसेच 12 पैकी 5 ज्योतिर्लिंगे आहेत. या ठिकाणी इतर भक्त तसेच इतर देशांतून अनेक भाविक भेट देतात.